घोडज तांडा येथे पशू आरोग्य तपासणी आणि गोचीड निर्मूलन मोहीम कार्यक्रम पार पडला…

घोडज तांडा येथे पशू आरोग्य तपासणी आणि गोचीड निर्मूलन मोहीम कार्यक्रम पार पडला…


कंधार तालुक्यातील घोडज तांडा येथे राज्य पशुसंवर्धन विभागा व संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी च्या सहाय्याने पशू आरोग्य तपासणी, उपचार आणि गोचीड निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, आणि एकूण ७० प्राण्यांचे उपचार करण्यात आले. शेतकऱ्यांना मावा (संसर्गजन्य एक्झिमा )रोगापासून शेळ्यांचे संरक्षण आणि दुग्धजन्य प्राण्यांमध्ये होणाऱ्या गोचीड संसर्गाचे व्यवस्थापन याबाबत प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या मोहिमेचे उद्दिष्ट प्राणी आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देणे होते. #animals #animallover #AnimalHealth #health #camp #Kandhar #पशू #आरोग्य #तपासणी #कंधार








Post a Comment

0 Comments