उन्हाळ्यात लिंबूची झाडे फुलवणे: शक्य आहे!

उन्हाळ्यात लिंबूची झाडे फुलवणे: शक्य आहे!




कागदी लिंबू पिकला एप्रिल – मे महिन्यात जास्त मागणी व बाजार दर असतात व त्या करीत लिंबू पिकला सप्टेबर महिन्यात तान देणे गरजेचे असते परंतु या काळात पाऊस जास्त असल्यामुळे ताण शक्य होत नाही अश्या परस्थित पिकला संजीवके (लिहोसीन ) वापरून ताण दिल्यामुळे फलधारणा जास्त होते व उत्पन्न वाढते. निमटेक येथे कागदी लिंबू या फळ पिकाचे अंदाजे ५० एकर क्षेत्र असल्यामुळे या गावामध्ये संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत डॉ संतोष चव्हाण यांनी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन या विषयावर प्रथम रेषीय प्रय्त्याक्षिक घेण्यात आले. तसेच सदरील शेतकर्यांना लिहोसीन वाटप करण्यात आले आणि बहार व्यवस्थापन करण्याकरीत झाडांना ताण देणे, खत व्यवस्थापन या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. प्रवीण चव्हाण, विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), यांनी शेतकऱ्यांना केव्हीकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. #लिंबू #लिंबूचीझाडे #हस्तबहार #उन्हाळा #शेतकरी #कृषी #मराठशेतकरी #महाराष्ट्र #lemon #lemoontree #flowering #summer #agriculture #farming #gardening #farmer 

Post a Comment

0 Comments