कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत लालवंडी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत लालवंडी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम



दि. 07/06/2024 वार शुक्रवार रोजी कृषी विज्ञान केंद्र लाल वंडी ता. नायगाव, जि.नांदेड तर्फे विशेष कापूस प्रकल्प -दादा लाड तंत्रज्ञान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील पीक संरक्षण विषय विषेतज्ञ डॉ. कृष्णा अंभुरे सर, प्रकल्पातील प्रभुदास उडतेवार व बालाजी चंदापुरे उपस्थित होते. डॉ. कृष्णा अंभुरे सर यांनी योग्य वान निवडूण लागवड कशी करावी तसेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे यावर मार्गदर्शन केले. बीज प्रक्रियेचे महत्त्व शेतकरी वर्गाला पटवून सांगितले. कापूस पिकाची योग्य अंतरावर लागवड करावी तसेच दादा लाड तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली. अंकुर च्या वेग वेगळ्या वाणाची माहिती देत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले.तसेच प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिले. माती परीक्षण करूनच योग्य ते खत व्यवस्थापन करावे असे आवाहन त्यांनी तेथे केले.

Post a Comment

0 Comments