कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मांजरम येथे विशेष कापूस प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मांजरम येथे विशेष कापूस प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.



दि.30/07/2024 वार मंगळवार रोजी मांजरम येथे केंद्रिय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रशिक्षणाला कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कीटकशास्त्रज्ञ तथा प्रकल्प नोडल अधिकारी डॉ. कृष्णा अंभुरे व विशेष कापूस प्रकल्पातील प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापूरे उपस्थित होते. यावेळी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी कापूस पीक वाढ व खत व्यवस्थापन बद्दल माहिती दिली तसेच कीड व रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकामधे आलेल्या समस्यांबाबत शंकाप्रश्न उपस्थित केले. त्या वेळी त्यांना कापूस पिका सोबतच सोयाबीन पिकाचे कीड व रोग नियंत्रण बद्दल माहिती देण्यात आली. तसेच कपाशीची गळफांदी काढणे व शेंडे खुड करावयाचा सल्ला उपस्थित तज्ञांकडून देण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी सूर्यकांत शिंदे, आनंदा शिंदे या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. यावेळी मांजरम येथील प्रकल्पातील शेतकरी उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments