लालवंडी ता. नायगांव, जि. नांदेड येथे विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत माहितीपर सभा.

लालवंडी ता. नायगांव, जि. नांदेड येथे विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत माहितीपर सभा.




कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत लालवंडी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे 2024-25 करिता केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या द्वारे विशेष कापूस प्रकल्प सुरू आहे. सघन लागवड व अती सघन लागवड पद्धत द्वारे पेरणी केलेल्या शेतकर्यांची निवड झाली असून सध्या कापूस जवळपास 35-40 दिवसांचा होता आला आहे. त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र चे प्रकल्प समन्वयक डॉ. कृष्णा अंभूरे, प्रकल्पातील यंग प्रोफेशनल प्रभुदास उडतेवार व बालाजी चांदापुरे यांनी लालवंडी गावात भेट दिली. जवळपास 100 एकर सघन लागवड पद्धत द्वारे कापूस लागवड या गावात झाले असून प्रकल्पातील शेतकरी यांच्यासाठी एक मार्गदर्शनपर सभा आयोजित करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.  सद्यस्थितीत असलेला कापूस, त्या वर येणारे रोग, खत व्यवस्थापन, कीड व त्यांची ओळख, एकात्मिक व्यवस्थापन ई. बद्दल माहिती देण्यात आली. दादा लाड कापूस लागवड पद्धत द्वारे गळफांदी व फळफांदी कशी ओळखावी व ती कधी छाटणी करावी याबद्दल बोलताना secateurs (कलम कैंची) चे असलेले महत्त्व त्यांनी शेतकरी वर्गाला समजावून सांगितले. जवळपास प्रकल्पातील सर्वच शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना असलेल्या शंका, तसेच कापूस पिका व्यतरिक्त अन्य खरीप पिकांबद्दल माहिती मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. 



Post a Comment

0 Comments