उन्हाळी भुईमूग पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण...
संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वतीने उन्हाळी भुईमूग प्रात्यक्षिक (२० हेक्टर) क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापनावर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात उन्हाळी भुईमुगावर येणाऱ्या मुख्य कीडी आणि रोगांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः रसशोषक कीड, पाने खाणाऱ्या अळ्या आणि टिक्का व तांबेरा यांसारख्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अल्पखर्चिक जैविक निविष्ठांचा प्रभावी वापर कसा करावा यावरही प्रशिक्षण दिले गेले. यासोबतच, शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी आवश्यक निविष्ठा पुरवण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रात्यक्षिक क्षेत्रातील ४० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन प्राप्त केले. #उन्हाळीभुईमूग #पीकसंरक्षण #पाणीव्यवस्थापन #कृषीप्रशिक्षण #शेतकरीविकास #शेतीतंत्रज्ञान #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #भुईमूगशेती #जैविकशेती
0 Comments