व्हीपीके अ‍ॅग्रो फूड प्रोडक्ट्स, उमरी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर चर्चा...

व्हीपीके अॅग्रो फूड प्रोडक्ट्स, उमरी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर चर्चा...


या भेटीदरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. विशेषतः ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर, तसेच कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत पुरविल्या जाणाऱ्या अल्पखर्चिक इनपुट्स आणि सेवा यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. चर्चेच्या मुख्य मुद्द्यांमध्ये केव्हीकेच्या इनपुट्स आणि सेवांचा पुरवठा, ऊस
शेतीतील एआय तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केव्हीकेमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला. व्हीपीके ग्रुपचे अध्यक्ष मा. मारोतरावजी कावळे, व्यवस्थापकीय संचालक श्री.अंबटवार, मुख्य कृषी अधिकारी श्री. पवार आणि श्री.सावंत यांच्यासोबत कंपनीच्या मुख्यालयात अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. कपिल इंगळे आणि डॉ. प्रविण चव्हाण यांनी व्हीपीके टीमसोबत सखोल संवाद साधून महत्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण केली. #व्हीपीकेॲग्रो #कृषीविज्ञानकेंद्र #ऊसउत्पादन #एआयतंत्रज्ञान #शेतकरी #कृषीविकास #उमरी #सगरोळी #कृषीतंत्रज्ञान #शेतकरीप्रशिक्षण #शेती #आधुनिकशेती #AI #aiinagriculture #agriculture #sugarcane #ऊसशेती


Post a Comment

0 Comments