राज्यस्तरीय विचारमंथन परिषद - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

राज्यस्तरीय विचारमंथन परिषद - पर्जन्यावर अवलंबून शेती प्रणालीतील शाश्वतता व ताण सहनशीलता वाढविणे हा विचारमंथनाचा मुख्य हेतू. ठिकाण-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.


आयोजक संस्था: महाराष्ट्र रिव्हायटलायझिंग रेनफेड अ
ॅग्रीकल्चर (Maha-RRA) नेटवर्क

- रिव्हायटलायझिंग रेनफेड अॅग्रीकल्चर नेटवर्क (RRAN), माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
महत्त्वाचे मार्गदर्शन व चर्चेचे बिंदू:
- स्थानिक शेती प्रणाली, पशुपालन, मासेमारी, आणि परंपरागत ज्ञान हे हवामान बदलाशी सुसंगत कसे करता येईल.
- देशी जनावरांच्या साहाय्याने नैसर्गिक शेती व उद्योजकतेला चालना.
- शाश्वत विकास योजनांमध्ये पारंपरिक पद्धतींचा समावेश आवश्यक.
- महाराष्ट्र हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शाश्वत उपायावर चर्चा.
- विद्यापीठाकडून ताण सहन करणाऱ्या वाण, जलसंधारण तंत्रे, 'रुंद सरी वरंबा' पद्धत, बैलचलित अवजारे यावर संशोधन व प्रसार करणे.
- Maha-RRA नेटवर्कसोबत वनामकृवीचे सामंजस्य कराराचे नियोजन.
- सुगंधी शेती क्षेत्रातील उत्तम संधी उदा. शतावरी, तुळस इत्यादी वर चर्चा.
- नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहनपर उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
- शबरी महामंडळाच्या SC/ST करीता विविध योजनांची माहिती.
- RRA नेटवर्क ची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी सल्लामसलत व अभिप्राय मागवणे. #agriculture #agriculture #farming #farmers #Maha_RRA

Post a Comment

0 Comments