आधुनिक आंबा लागवड तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

आधुनिक आंबा लागवड तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम


दि. २५ जून २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, बीदर यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सुधारित आंबा लागवड तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि आंबा शेतीच्या आर्थिक लाभांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. डॉ. संतोष चव्हाण, उद्यानविद्या यांनी आंबा लागवडीसाठी आवश्यक घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये जमीन तयारी, अनुकूल हवामान, आधुनिक लागवड पद्धती व त्याचे फायदे, योग्य जातींची निवड, पोषण व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, फळ काढणीनंतर प्रक्रिया व मार्केटिंगचे प्रभावी तंत्र यांचा समावेश होता. उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींच्या स्वीकारावर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक सत्रही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन योग्य लागवड तंत्र, निरोगी रोपांची निवड, तसेच वळण आणि छाटणीचे प्रात्यक्षिके पाहिली. यासोबतच सहभागी शेतकऱ्यांनी KVK रोपवाटिका भेट देऊन प्रत्यक्ष रोपे निवडी बाबत माहिती घेतली. #केशर #आंबा #आंबाबागायतदार
😎
#mango #MangoPlantation #training #trainingday #trainingprogram #farming #farming #farmers



Post a Comment

0 Comments