उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्ये!
संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र आणि बीसीआरसी प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने "उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारात वापर" या विषयावर लघुळ (ता. बिलोली) येथे अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लघुळ, शिंपाळा, सगरोळी, बोलेगाव, कारला, येसगी येथील अंगणवाडी सेविका आणि महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. डॉ. माधुरी रेवनवार यांनी पौष्टिक तृणधान्ये (मिलेट्स) आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मिलेट्सपासून घरी सहज तयार करता येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती दिली.
यावेळी बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडीतील मुलांना पूरक आहार म्हणून दिले जाणारे पौष्टिक फूड मिक्स तयार करण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खूपच उपयुक्त ठरला. #Millet #nutrition #संस्कृतीसंवर्धनमंडळ #कृषिविज्ञानकेंद्र #BCRCप्रकल्प #पौष्टिकतृणधान्ये #मिलेट्स #आरोग्य #अंगणवाडीसेविका #महिलाप्रशिक्षण #लघुळ #नांदेड
0 Comments