कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि सगरोळीच्या कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत पिंपळगाव आणि दगडापूर येथील शेतकऱ्यांनी 'दादा लाड कापूस तंत्रज्ञान' पद्धतीनुसार कापसाची लागवड केली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात, डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना कापसातील गळ फांद्या कशा कापाव्यात, खत आणि तण व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती दिली. यामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे तसेच निंबोळी अर्काचा वापर कसा करावा, हे त्यांनी सविस्तर सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान दगडापूर येथील शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन त्यांना प्रत्यक्ष शेतातच मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, बाळापूर येथील शेतकरी श्री. रवींद्र पोतगंटीवार यांच्या शेतावर श्री. दादा लाड यांच्या उपस्थितीत लागवड अंतर, गळफांदी काढणे, शेंडा खुडणे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष कापूस प्रकल्पाचे श्री. प्रभुदास उडतेवार आणि श्री. बालाजी चंदापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. #कापूस #शेतकरी #प्रशिक्षण #कृषिविज्ञान #नांदेड #दादालाडतंत्रज्ञान #कृषि #शेतकरीविकास #कापूससंशोधन #नागपूर
.jpg)
.jpg)
.jpg)
0 Comments