गाढवांकडे दुर्लक्ष केले जाते कारण ते ना धार्मिक प्राणी आहेत ना लोकांना गोंडस वाटतात

गाढवांकडे दुर्लक्ष केले जाते कारण ते ना धार्मिक प्राणी आहेत ना लोकांना गोंडस वाटतात

गाढवांकडे दुर्लक्ष केले जाते कारण ते ना धार्मिक प्राणी आहेत ना लोकांना गोंडस वाटतात, असे स्पष्ट मत मा. मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यानं गाढव संवर्धनाची गरज अधोरेखित झाली असून धर्मा डाँकी सॅंन्च्युरीने या दिशेने केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यरत अश्ववर्गीय प्राण्यांचे सामान्य आरोग्य प्रश्न आणि त्यांचे व्यवस्थापन – एक प्रत्यक्ष दृष्टिकोन या विषयावर धर्मा डाँकी सॅंन्च्युरीतर्फे कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग यांच्यासाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात अनुभवी तज्ञ आणि क्षेत्रीय पशुवैद्य एकत्र आले होते, ज्याचा उद्देश अश्व वर्गीय प्राण्यांमध्ये आरोग्य सेवांबाबत प्रत्यक्षपणे अनुभव घेणे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रमोद देशमुख, अध्यक्ष, धर्मा डाँकी सॅंन्च्युरी आणि डॉ. अनिल भिकाने, माफ्सूचे माजी विस्तार संचालक होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनवणे, प्रादेशिक सह आयुक्त, लातूर; डॉ. राजकुमार पडिले, उपायुक्त पशुसंवर्धन, नांदेड,आणि मा. मेघना कावली यांची उपस्थिती लाभली.
अश्व उपचार तज्ञ डॉ. दिनेश मोहिते यांनी कार्यरत अश्व वर्गीय प्राण्यांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर सखोल माहितीपूर्ण सत्र घेतले. तर डॉ. निहाल मुल्ला यांनी सामान्य रोगांचा प्रतिबंध, तसेच नवजात ते प्रौढ आश्र्वंचे लसीकरण व अंत:परजीवी निर्मूलनाचे वेळापत्रक यावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात एकूण ८१ क्षेत्रीय पशुवैद्यक सहभागी झाले. कार्यक्रमाची सांगता पोटसुळ बाधित प्राण्यांमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या ‘स्टमक ट्यूब इंट्युबेशन’ या प्रक्रियेच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून झाली. या प्रात्यक्षिकामुळे आणि संवादात्मक सत्रांमुळे क्षेत्रीय पशुवैद्य अधिक आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे अश्व वर्गीय प्राण्यांचे आरोग्य प्रश्न हाताळू शकतील.
हा कार्यक्रम केवळ वैद्यकीय क्षमतेचे बळकटीकरण करणारा नव्हता, तर गाढव व इतर कार्यरत अश्व वर्गीय प्राणी कल्यानाकडे कडे लक्ष वेधणारा होता – जे ग्रामीण जीवनशैलीतील न बोलणारे, पण अत्यंत महत्त्वाचे सहकारी आहेत. #गाढव_संवर्धन #Donkey_Conservation #प्राणीकल्याण #Animal_Welfare #अश्ववर्गीय_प्राणी #Equine_Animals #पशुधन_संरक्षण #DharmaDonkeySanctuary #DDS #पशुवैद्यकीय_प्रशिक्षण #Veterinary_Training Dharma Donkey Sanctuary - DDS @dds_sagroli



Post a Comment

0 Comments