हळद पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान: ढोलउमरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

हळद पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान: ढोलउमरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


हळदी पिकामध्ये टर्मरिक स्पेशल मायक्रोन्युट्रिएंट च्या वापराविषयी प्रात्यक्षिक आणि अन्नद्रव्या व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम ता. उमरी येथील ढोलउमरी गावात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास गावातील एकूण 18 हळद उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते, त्यापैकी 13 शेतकऱ्यांची प्रात्यक्षिकाकरिता निवड करण्यात आली. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात प्रयोगासाठी टर्मरिक बूस्टर वितरित करण्यात आले. सूक्ष्म अन्नद्रव्या वापरामुळे हळदीचे उत्पादन 15–25% पर्यंत वाढते तसेच कंदाची गुणवत्ता सुधारते. या साठी शिफारस केलेल्या फवारणी वेळापत्रकाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यामध्ये लागवडीपासून 60 दिवसांनी पहिली फवारणी, त्यानंतर 90 व 120 दिवसांनी प्रत्येकी एक अशी एकूण तीन फवारण्या करण्याची पद्धत सांगण्यात आली. या पद्धतीमुळे पिकाचा उत्तम विकास होऊन उत्पादनक्षमता वाढते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीचे विषयतज्ञ (बागायती) डॉ. संतोष चव्हाण यांनी शाश्वत हळद उत्पादनासाठी एकात्मिक पोषण व्यवस्थापन (INM) पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. #agriculture #kvksagroli #कृषी #शेतकरी #farmer #शेती #हळद #शेतकरी #प्रशिक्षण #मायक्रोन्युट्रिएंट #Turmeric

Post a Comment

0 Comments