सोयाबीन आरोग्यास वरदान ....
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सागरळी आणि बिल्डिंग क्लायमेट रेसिलियंट कम्युनिटी प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमिता लर्निंग सेंटर येथे “सोयाबीन मूल्यवर्धन” या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि विविध पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या सोयाबीनचे आरोग्य संवर्धनात महत्त्वाचे स्थान आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना सोयाबीनचे पोषणमूल्य समजावून सांगणे तसेच त्यावर आधारित विविध मूल्यवर्धित पदार्थांची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात सहभागी महिलांना सोयाबीनचे दैनंदिन आहारातील महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सोया दूध, पनीर, चिवडा, सोयाने, डाळ इत्यादी पदार्थांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन दाखविण्यात आले. सहभागी महिलांना हातावरची कामगिरी (हॅण्ड्स-ऑन ट्रेनिंग) देण्यात आली ज्यामुळे त्यांना ही प्रक्रिया आत्मसात करून घरगुती वापरासोबतच उत्पन्नवाढीसाठीही उपयोगी पडेल. स्वच्छता पखवाडा दि. १७ सप्टेंबरपासून सुरु झाल्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व सहभागींकडून स्वच्छतेची शपथ देखील देण्यात आली. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. सहभागी महिलांमध्ये सोयाबीनचे पोषणमूल्य व मूल्यवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच उत्पन्नवाढीसाठी त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले. #women #womenpower #WomensHealth #womensfitness #womeninbusiness #womensupportingwomen
0 Comments