समुह प्रथमदर्शनी एकात्मिक पीक व्यवस्थापन उडीद शेती दिन साजरा
संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे मौजे सुगाव व जुन्ना ता. मुखेड जि. नांदेड येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्रायोजित उडीद पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक राबविण्यात आले होते आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जून महिन्यात बियाणे तसेच बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या निविष्ठा वाटप करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी आवश्यक निविष्ठा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये वाटप करण्यात आले होते त्या अनुषंगाने सदर प्रात्यक्षिकाचा शेती दिन साजरा करण्यात आला. सध्या शेतकऱ्यांचे पिक काढणीच्या अवस्थेत आहे आणि काही शेतकऱ्यांचे पिक काढणी झाले असून एकरी ३.५ ते ४ क्विंटल उत्पादन मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांना देखील पारंपारिक उडदापेक्षा या उडदाची प्रत चांगली आहे आणि पारंपारिक उडदापेक्षा जास्त उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे. #राष्ट्रीय_अन्नसुरक्षा #योजना #agriculture #kvksagroli #कृषी #शेती #दिन #उडीद #एकात्मिक_पीक_व्यवस्थापन
0 Comments