भोकर येथे कॉटन कनेक्ट प्रकल्पातील प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
कॉटन कनेक्ट संस्थेच्या वतीने कापूस पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन भोकर येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेत पूरस्थितीनंतर कापूस पिकाचे प्रभावी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, स्वच्छ व गुणवत्ता युक्त कापूस वेचणी, तसेच कपाशीच्या पराठ्यापासून बायोचार निर्मिती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील तज्ज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात कॉटन कनेक्ट संस्थेच्या भोकर व हिमायतनगर तालुक्यातील सुमारे 60 प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली असून, ती पुढे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. #cotton #agriculture #womenpower #kvksagroli
0 Comments