अन्न, आरोग्य, स्वच्छता व कर्करोग जनजागृती कार्यक्रम

अन्न, आरोग्य, स्वच्छता व कर्करोग जनजागृती कार्यक्रम



राष्ट्रीय पोषण महिना 2025 निमित्त, संस्कृति संवर्धन मंडळाचे कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, नांदेड यांच्या वतीने व ग्रामीण तांत्रिक व व्यवस्थापन महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड यांच्या सहकार्याने अन्न, आरोग्य, स्वच्छता व कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दोन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, शेकडो विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. माधुरी रेवणवार यांनी आपल्या मार्गदर्शनात पौष्टिक आहाराचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक असणारे विविध पोषक घटक याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेचे महत्त्व, कर्करोग विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची कारणे व त्यावरील काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत विविध सॅनिटरी नॅपकीनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थिनींसमोर दाखविण्यात आले. सत्रादरम्यान विद्यार्थिनींनी उत्साहाने प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
या प्रात्यक्षिकात सौ पल्लवी वटपलवाड यांनी देखील मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. देऊळगावकर, डॉ. दरक, डॉ. धोत्रे व प्रा. वैशाली सावत यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम माहितीपूर्ण, संवादात्मक व उपयुक्त ठरला आणि विद्यार्थिनींमध्ये पोषण, स्वच्छता व प्रतिबंधात्मक आरोग्य या विषयांबाबत आवश्यक जनजागृती घडवून आणली. #पोषणमहिना2025 #पोषणजागृती #आरोग्यपूर्णजीवन #महिला_आरोग्य #स्वच्छता_जागृती #कर्करोग_जागृती #कृषिविज्ञानकेंद्र_सगरोळी #ग्रामीणतंत्रमहाविद्यालय_नांदेड #NutritionMonth2025 #PoshanMaah #WomenHealth #HygieneMatters #CancerAwareness #HealthyLiving



Post a Comment

0 Comments