जैविक कीड नियंत्रण आणि सुगंधी वनस्पती प्रक्षेत्राला भेट!
संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत असलेल्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व सुगंधी वनस्पती प्रक्षेत्र, अटकळी येथे जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, कृषि विभाग, धनेगाव जि. नांदेड टीमने सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, अटकळी येथील जैविक प्रयोगशाळेची संपूर्ण माहिती देण्यात आली. विशेषतः ट्रायकोडर्मा या अत्यंत उपयुक्त जैविक बुरशीनाशकाचे (Bio-fungicide) महत्त्व आणि कार्यपद्धती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याव्यतिरिक्त, टीमने सुगंधी वनस्पती प्रक्षेत्राची (Aromatic Plant Field) पाहणी केली. तसेच, या वनस्पतींपासून तेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिस्टिलेशन युनिट (Distillation Unit) बद्दल उपयुक्त माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांसाठी जैविक तंत्रज्ञान आणि सुगंधी वनस्पती लागवडीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. #जैविककीडनियंत्रण #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #अटकळी #धनेगाव #नांदेड #ट्रायकोडर्मा #सुगंधीवनस्पती #डिस्टिलेशनयुनिट #शेतीतंत्रज्ञान #जैविकशेती #kvksagroli #krushived2026



0 Comments