कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी! 'कृषी विज्ञान केंद्र (KVK) सगरोळी, नांदेड-२' ला पुरस्कार प्रदान!

कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी! 'कृषी विज्ञान केंद्र (KVK) सगरोळी, नांदेड-२' ला पुरस्कार प्रदान! 

🏆
कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी! 'कृषी विज्ञान केंद्र (KVK) सगरोळी, नांदेड-२' ला पुरस्कार प्रदान!
🎉
कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, नांदेड-II केंद्राला कृषी विस्तारातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठित NAAS Dhanuka Award for Excellence in Agriculture Extension 2026 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ​'नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चरल सायन्सेस' (NAAS), दिल्ली च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका विशेष समारंभात हा मानाचा पुरस्कार'प्रदान करण्यात आला.
​या सोहळ्याला ​डॉ. एम. एल. जाट (ICAR संचालक आणि NAAS अध्यक्ष), ​डॉ. हिमांशू पाठक ​संचालक, ICRISAT, हैदराबाद डॉ. आर. के. जोशी उपाध्यक्ष, NAAS, ​डॉ. बलराज सिंग धिल्लन उपाध्यक्ष, NAAS. तसेच
कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते. ​नांदेडच्या कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी बांधवांपर्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार सेवा प्रभावीपणे पोहोचवून हा बहुमान मिळवला आहे. केव्हीके सगरोळीच्या संपूर्ण टीमचे या यश्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
🌾

Post a Comment

0 Comments