खेती बचाओ अभियान

खेती बचाओ अभियान


पंचायत समिती, बिलोली ता. बिलोली जि. नांदेड येथे खेती बचाओ अभियान अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. कृष्णा अंभुरे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी शेतकऱ्यांना अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः संतुलित खत व्यवस्थापन, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जैवखतांचा वापर, एल-निनोचा शेतीवर होणारा परिणाम व त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती दिली. तसेच आगामी खरीप हंगामातील पीक उत्पादन तंत्रज्ञानाबाबत देखील मार्गदर्शन केले.
श्री. विवेक गुडुप, तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना बाजारात उपलब्ध असलेल्या विविध एन.पी.के. खतांबाबत माहिती देऊन युरिया व डी.ए.पी. खतांचा वापर कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. तिडके, मंडळ कृषी अधिकारी यांनी राज्य कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
तसेच श्री. सतीश कांबळे, बी.टी.एम. (ATMA) यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गटांची स्थापना, त्यांचे महत्त्व व शेतकरी गटांसाठी उपलब्ध विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. #खेतीबचाओअभियान

Post a Comment

0 Comments