नायगाव येथे ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते फार्मर कपचा लाइव्ह शुभारंभ कार्यक्रम झाल्यानंतर नायगाव येथे ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम घेण्यात आला. कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीचे डॉ. प्रवीण चव्हाण यांनी शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर, एल निनो पार्श्वभूमीवर खरीप नियोजन व कीड-रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषि अधिकारी विठ्ठल गीते, ता.कृ.अ. दीपेश देवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. #agriculture #farming #एलनिनो #किसानगोष्टी #कीडरोग

0 Comments