केव्हीके सगरोळी तर्फे लिंगण केरूर ता. देगलूर येथे 'शेत वाचवा' जनजागृती मोहीम

केव्हीके सगरोळी तर्फे लिंगण केरूर ता. देगलूर येथे 'शेत वाचवा' जनजागृती मोहीम



शेतकऱ्यांमध्ये पीक उत्पादन, पीक उत्पादनातील विविधता आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून फळपिकांची लागवड याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण आणि पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दोन्ही तज्ज्ञांनी हवामान-अनुकूल शेती, मृदा आणि जलसंधारण पद्धती, पीक अवशेष व्यवस्थापन, वाणांची निवड, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर आणि शाश्वत उत्पन्नासाठी फळपीक उत्पादन या विषयांवर शेतकऱ्यांना चर्चा केली. बदलत्या हवामानात पारंपरिक शेतीला आधुनिकतेची आणि फळबाग लागवडीची जोड देणे ही काळाची गरज. #खेतीबचावअभियान #फळबागा #लागवड #शेतीतंत्रज्ञान #हवामान_अनुकूल_शेती #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #BBFतंत्रज्ञान #आधुनिकपेरणी #सूक्ष्मसिंचन #कृषी_विज्ञान_केंद्र #FarmersFirst #SustainableFarming #AgricultureMaharashtra #ICAR #kvk_sagroli #kvksagroli Icaratari Pune

Post a Comment

0 Comments