बडूर येथे खेत बचाओ मोहिमेचे आयोजन

बडूर येथे खेत बचाओ मोहिमेचे आयोजन


कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने बडूर येथे खेत बचाओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांमध्ये पीक उत्पादन वाढवणे, पिकांमधील विविधता आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून फळबागांची लागवड याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमात कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. प्रियांका खोले आणि उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दोन्ही तज्ज्ञांनी हवामान-अनुकूल शेती, मृदा आणि जलसंधारण पद्धती, पीक अवशेषांचे व्यवस्थापन (पराटी/काडीकचरा व्यवस्थापन), पिकांच्या वाणांची निवड, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), खतांचा संतुलित वापर आणि शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांचे उत्पादन याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी विभागाचे श्री. कांबळे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात एकूण ३८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. उपस्थित शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून पीक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, पीक संरक्षण आणि हवामान-अनुकूल शेती पद्धतींबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शेतकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादासह या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
#खेतीबचावअभियान #फळबागा #लागवड #शेतीतंत्रज्ञान #हवामान_अनुकूल_शेती #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #BBFतंत्रज्ञान #आधुनिकपेरणी #सूक्ष्मसिंचन #नांदेडशेतकरी #शाश्वतशेती #ICAR @icarataripune

Post a Comment

0 Comments