तेलबिया पीक उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान
तेलबिया पीक उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया योजनेअंतर्गत संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत नायगाव तालुक्यातील राहेर आणि बिलोली तालुक्यातील बडूर या गावात प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे ७५ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर सोयाबीन पिकाचे एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिक राबवण्यात आले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी सोयाबीन पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सुधारित वाणांचा वापर, बियाणे उगवण चाचणी, बीबीएफ पद्धतीने पेरणी, बीज प्रक्रियेचे महत्त्व, खतांचे योग्य व्यवस्थापन तसेच तण व्यवस्थापन ई. बाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सुधारित वाण (पीडीकेव्ही अंबा) आणि बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचे वाटप केले. पुढील टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करुन सोयाबीन पिकातील किड व रोग व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. #राष्ट्रीय_खाद्यतेल_अभियान #कृषि_विज्ञान_केंद्र #सगरोळी #सोयाबीन_उत्पादन #शेतकरी_प्रशिक्षण #आत्मनिर्भर_भारत #कृषी_विकास #सोयाबीन_पीक_व्यवस्थापन #बीबीएफ_पद्धत #बीजप्रक्रिया #एकात्मिक_पीक_व्यवस्थापन



0 Comments