रब्बी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण...

 रब्बी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण...



रिलायन्स फाऊंडेशन आणि संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने राहेर ता. बिलोली जि. नांदेड येथे रब्बी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. परिसरातील रब्बी पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. हरभरा आणि ज्वारी ही गावातील प्रमुख रब्बी पिके आहेत आणि त्या अनुषंगाने डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना हरभरा आणि ज्वारी पिकांवरील कीड व रोगांची ओळख आणि त्यांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. पिक बदल या विषयी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करताना त्यांनी राजमा लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. श्री. माधव ताटे व श्री. नितीन सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. #rabi2022_23 #farming #kvksagroli #nanded #crops #integratedfarming




Post a Comment

0 Comments