ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अग्रिकल्चर स्टार्टअप च्या माध्यमातून भविष्यातील संधीचा अचूक वेध घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) नी काम करावं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अग्रिकल्चर स्टार्टअप च्या माध्यमातून भविष्यातील संधीचा अचूक वेध घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) नी काम करावं : पंतप्रधान नरेंद्र मोदी


दिनांक 17 आणि 18 ऑक्टोंबर 2022 रोजी नई दिल्ली येथे पीएम किसान सन्मान संमेलन2022 भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडले. कृषि क्षेत्रात खूप झपाट्याने बदल होत आहेत युवा शेतकऱ्यांनी त्या बदलाचे साक्षीदार व्हावे. भारतात आणि परदेशात कृषि क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. ॲग्रिकल्चर स्टार्टअप च्या माध्यमातुन भविष्यातील संधीचा अचूक वेध घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) नी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पंतप्रधानांनी आपल्या मार्गदर्शनातून केलं.
या कृषि संमेलनासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी कडून प्रतिनिधी म्हणून नांदेड जिल्ह्यातून 5 (वेगळ्या क्षेत्रातील कृषि, फळबाग व भाजीपाला, FPO आणि गोपालक) शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय संमेलनात 600 ॲग्रिकल्चर स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता ज्या की नवनविन संकल्पना घेऊन आज कृषि क्षेत्रात यशस्वी पणे काम करत आहेत. त्या मधील एक बीजॅक नावाची स्टार्टअप जे शेतकऱ्यांना आपण पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव मिळावा यासाठी व्यापारी आणि शेतकरी यांच्या मधील दुवा म्हणून एका मोबाईल ॲप द्वारे काम करत आहे. त्या मधील दुसरी स्टार्टअप कंपनी GREEN JAMS आहे जी की शेतामधील विविध पिकांच्या अवशेषांपासून जे की जाळण्यात येत होते त्या पासून घर बांधकामासाठी लागणारे विट बनवतात कमी शब्दात सांगायचं झालं तर Waste To Wealth म्हणून काम करते.
त्या मधील तिसरी एक स्टार्टअप आहे जे गाई च्या शेणापासून नॅनो सेल्युलोज बनवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत उत्पन्न देणारा एक मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे. शेतकऱ्यांनी नी या सर्व ॲग्रिकल्चर स्टार्टअप च्या प्रतिनिधींशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली आणि भविष्यात या स्टार्टअप कंपनी च्या संकल्पनेवर आधारित नविन उद्योग ग्रामीण भागात कश्या पद्धतीने चालु करता येईल या साठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी नक्की प्रयत्न करेल. #pm #kisan #samman #delhi #farmer #agriculture #kvk #sagroli #pmkisanscheme #NarendraSinghTomar #Pradhan_Mantri_Kisan_Samman_Nidhi (PM-KISAN) @gadkari.nitin PMO Narendra Modi Narendra Singh Tomar #kvk #sagroli #nanded #PusaKrishiStartup Pusa Krishi





Post a Comment

0 Comments