26 कृषीसखी, पशूसखींच्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची

 26 कृषीसखी, पशूसखींच्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण


"प्रचोधन डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (PDS) यवतमाळ" या संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या 26 कृषीसखी, पशूसखींच्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची उत्कर्ष लर्निग सेंटर कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे काल जागतिक मृदा दिनी सुरुवात झाली.या तीन दिवसीय प्रशिक्षणा मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार असून या मध्ये माती परिक्षण, उद्योजकता विकास व भाडेतत्वा वरील औजारे बँक या विषयांचा समावेश आहे. जागतिक मृदा दिवसाचे औचित्य साधून काल जमिनीचे आरोग्य संवर्धन व माती परिक्षणाचे महत्व या विषयावर प्रा.वेंकट शिंदे,यांनी मार्गदर्शन केले तसेच श्री.प्रवीण मिणके यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांविषयी माहिती सांगितली. डॉ.माधुरी रेवणवार उद्योजकता विकास व महिंद्रा ट्रॅक्टर चे श्री. आनंद पाटील भाडेतत्त्वावरील औजारे बँक" या विषयांवर मार्गदर्शन केले आहेत. #women #empowerment #rural #bussiness #kvksagroli #training






Post a Comment

0 Comments