एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनामुळे फुलकिडे, हुमणी अळी तसेच चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..

 एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनामुळे फुलकिडे, हुमणी अळी तसेच चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..



संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत बरबडा ता. नायगाव येथे १५ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर “मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” याविषयी प्रथमदर्शनी कार्यक्रम राबविण्यात आला. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि किड व रोग व्यवस्थापन संबंधी ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, कामगंध सापळे, निंबोळी पावडर, चिकट सापळे ई. निविष्ठा वाटप करण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली व शिफारशीनुसार निविष्ठांचा वापर केला. सदर शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर शेतीदिन कार्यक्रम आयोजित करून पिक पाहणी करण्यात आली असता एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनामुळे फुलकिडे, हुमणी अळी तसेच चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मेटारायझियम किटकनाशकाचा प्रभावी परिमाण दिसून आला व हुमणी अळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व प्रयोगाबाबत समाधान व्यक्त केले. #agriculture #kvksagroli #farmer #farm




Post a Comment

0 Comments