हर्षा ट्रस्ट, भुवनेश्वर (ओडिशा) येथील कर्मचाऱ्यांनी घेतले रेशीम संगोपन प्रशिक्षण

हर्षा ट्रस्ट, भुवनेश्वर (ओडिशा) येथील कर्मचाऱ्यांनी घेतले रेशीम संगोपन प्रशिक्षण


रेशीम संगोपन हा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या प्रकारे रेशीम संगोपन व्यवसाय वाढत आहे त्या तुलनेत ओडिशा राज्यात पाहिजे तसा शेतकऱ्यांचा कल ह्या व्यवसायाकडे दिसत नसल्याने ह्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी विविध सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या हर्षा ट्रस्ट, भुवनेश्वर (ओडिशा) ह्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे रेशीम संगोपन या विषयावर २८ व २९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले. दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी तुती रोपवाटिका, तुती लागवड तंत्रज्ञान, तुतीवरील कीड-रोग व त्यांचे व्यवस्थापन, रेशीम किटकांवरील कीड-रोग व त्यांचे व्यवस्थापन, कोष विक्री व्यवस्था ई. विषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान आदमपूर ता. बिलोली येथील रेशीम संगोपन करणारे शेतकरी श्री. विनोद पेंटे यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन रेशीम संगोपनाचे प्रात्यक्षिक व शेतकऱ्याचे अनुभव जाणून घेतले. दोन दिवसीय भेटीदरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांना भेटी देऊन याविषयी माहिती जाणून घेतली. #sericulture 🐛 #kvksagroli #nanded #agricultureeducation #harsha #trust #Odisha #agricultureworldwide #training #रेशीम #संगोपन #प्रशिक्ष








Post a Comment

0 Comments