रब्बी हंगामातील पीक बदलावर शेतीशाळा आयोजन

 रब्बी हंगामातील पीक बदलावर शेतीशाळा आयोजन


संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व आत्मा बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने केसराळी तालुका बिलोली येथे धने व राजमा प्रक्षेत्रावर शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी विभाग बिलोली मार्फत रब्बी हंगामामध्ये पीक बदल व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले .रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकापासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धने व राजमा पिक लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले . सध्या ही दोन्ही पिके काढणीच्या अवस्थेमध्ये आहेत, प्रत्यक्ष या पिकाची पाहणी करण्यासाठी केसराळी येथील प्रयोगशील शेतकरी श्री गणेश काळे यांच्या शेतावर शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे , डॉ.कृष्णा अंभूरे व आत्मा बिलोली तालुका तंत्र व्यवस्थापक श्री सतीश कांबळे होते . या शेती शाळेत केसराळी परिसरातील ५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला व पीक पाहणी केली . #farms #soil #हवामान_अंदाज #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices






Post a Comment

0 Comments