समाजातील एक उपेक्षित प्राणी म्हणून गाढवाला पाहिले जाते.

समाजातील एक उपेक्षित प्राणी म्हणून गाढवाला पाहिले जाते. अश्या या कष्टाळू आणि इमानदार प्राण्यांचा मराठवाड्यातील सर्वात मोठा बाजार माळेगाव यात्रे निमित्त दर वर्षी भरत असतो. मागील २-३ वर्षांपासून कोरोना मुळे यात्राच भरली नाही. परंतु या वर्षी मोठ्या उत्साहाने यात्रा भरली आणि पशू प्रदर्शन आणि बाजारही भरला. बाजारात आलेल्या हजारो गाढवांची खरेदी विक्री ही झाली. या दरम्यान अनेक गाढवांना प्रवासात जखमा झालेल्या आणि ते आजारी सुद्धा पडले. तसेच गाढव पालकांमधील अज्ञानतेमुळे त्यांचे नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी आणि उपचार करत नसल्याने त्यांचे स्वास्थ्य खूपच खराब असते. म्हणूनच अश्या या कष्टाळू सोबत्याला मदतीसाठी धर्मा डाँकी साँगच्युरी आणि कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या तर्फे गाढवांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले गेले होते. या शिबिरात आजारी जनावरांना आवश्यक उपचार, मोफत जंतुनाशक औषधे देऊन जंतूनिर्मूलन आणि जखमी गाढवांना मलमपट्टी व औषधोपचार करण्यात आले. #जनावरे #KrishiVigyanKendra #kvksagroli #farmers #animal #animallovers #care #animals #donkey #donkeyrescue #donkeysanctuary #donkeylove #गाढव #MalegaonYatra #nanded #newsupdate #malegaonyatra





Post a Comment

0 Comments