आर्थिक आणि डिजिटल साक्षरता महत्त्वाची...
अनेक महिला बचत गट सध्या खूप चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहेत. बदलत्या वातावरणामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक बचत गटांच्या महिला व्यवसाय देखील करत आहेत. परंतु जोपर्यंत आर्थिक व डिजिटल साक्षरता होणार नाही तोपर्यंत महिला बचत गटांच्या कार्याला तसेच उद्योग व्यवसायाला योग्य दिशा मिळणार नाही. म्हणूनच संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत चालू असलेला रिलायन्स फाउंडेशन - हवामान अनुकूल शेती पद्धती, कृषी विज्ञान केंद्र आणि उमेद अभियान बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी बिलोली येथील पंचायत समिती सभागृहामध्ये बचत गटांच्या आय सी आर पी, बँक सखी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या प्रशिक्षणामध्ये आर्थिक व डिजिटल साक्षरतेसाठी आवश्यक सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये श्री गणेश वर्मा, श्री मुपडे, श्री कोकीळ, सौ. पंचफुला वड्डे, डॉ. माधुरी रेवनवार, श्री बेले, श्री नरहरे यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments