बांबू लागवड या विषयावर मार्गदर्शन
आरळी ता बिलोली येथे दिनांक २९/०८/२०२३ रोजी कृषि विभाग बिलोली व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ संतोष चव्हाण यांनी बांबू लागवड या विषयावर मार्गदर्शन केले. या मध्ये बांबू लागवडीसाठी जातीची निवड, शात्रीय पद्तीने रोपे लावणे, लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन तसेच बांबूचे विक्री व्यवस्थापन या बद्दल सविस्तर माहिती सांगतली. तालुका कृषी अधिकारी बिलोली, श्री पवार साहेब यांनी कृषी विभागातील विविध योजना व सद्य परिस्थिती मध्ये सोयाबीन व कापूस पिकातील निओजन या बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्री कांबळे यांनी केले. #farming #Bamboo #kvk #farmers #agriculture #NaturalBeauty #Sustainability


0 Comments