गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा..
तण संशोधन संचालनालय, जबलपूर यांच्या मार्फत दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट दम्यान गाजरगवत जागरूकता सप्ताह देशभरात साजरा करण्यात येतो आणि त्याच अनुषंगाने संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीद्वारे वरील कालावधीत गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. गाजरगवत जागरूकता सप्ताह दरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी विद्यार्थ्यांना गाजर गवताचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले आणि कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी, बीबीए-एबीएम महाविद्यालय, सगरोळी तसेच राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी येथील विद्यार्थ्यांनी परिसरातील गाजरगवत निर्मुलन करून गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा केला. सप्ताहातील एक दिवस काटकळंबा गावातील शेतकऱ्यांना डॉ. संतोष चव्हाण यांनी मार्गदर्शन करून गाजरगवत निर्मुलन केले. #MeriMaatiMeraDesh #farmers #Parthenium #AwarenessWeek #kvk #sagroli #nanded #agriculture
0 Comments