कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत नायगाव तालुक्यातील लालवंडी व मांजरम येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत नायगाव तालुक्यातील लालवंडी व  मांजरम येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम


दि. 10/06/2024 वार सोमवार रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे 'विशेष कापूस प्रकल्प -दादा लाड तंत्रज्ञान' अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कापूस प्रकल्पातील प्रभुदास उडतेवार व बालाजी चंदापुरे उपस्थित होते. श्री. प्रभूदास उडतेवार यांनी योग्य वान निवडूण लागवड कशी करावी तसेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे यावर मार्गदर्शन केले. कापूस पिकाची योग्य अंतरावर लागवड, तसेच दादा लाड तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली. अंकुर च्या वेग वेगळ्या वाणाची माहिती देत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले. सेच प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिले.







Post a Comment

0 Comments