कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत देगलूर तालुक्यातील रामपूर येथे कापूस लागवड जागरुकता कार्यक्रम



दि. 10/06/2024 वार सोमवार रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे 'विशेष कापूस प्रकल्प -दादा लाड तंत्रज्ञान'  अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम व कापूस लागवड जागरुकता कार्यक्रम संपन्न झाला.  कापूस  प्रकल्पातील श्री. प्रभूदास उडतेवार यांनी योग्य वाण निवडून लागवड कशी करावी तसेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे यावर मार्गदर्शन केले. कापूस पिकाची योग्य अंतरावर लागवड, तसेच दादा लाड तंत्रज्ञान बद्दल माहिती देत असताना गळफांदी व फळफांदी कशी ओळखावी या बद्दल मार्गदर्शन केले. अंकुर च्या वेग वेगळ्या वाणाची माहिती देत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे  समाधानकारक उत्तर दिले. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments