जैविक निविष्ठांचा वापर सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी फायदेशीर

जैविक निविष्ठांचा वापर सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी फायदेशीर


– विकसित कृषि संकल्प अभियानाचा १२ वा दिवस. जैविक निविष्ठांचा प्रभावी उपयोग आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम लोहा तालुक्यातील पळशी, मडकी, कारेगाव आणि कंधार तालुक्यातील घोडज, लाठ खुर्द व काटकळम्बा या गावांमध्ये पार पडला. या वेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर चे डॉ. शिरगुरे आणि श्री. डमाळे, तसेच प्रादेशिक ऊस संशोधन केंद्राचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे यांनी सेंद्रिय शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा आंभुरे, प्रशांत शिवपनोर आणि बालाजी चंदापुरे यांनी जैविक निविष्ठांच्या प्रभावी वापराबाबत तांत्रिक माहिती दिली. कृषि विभागाचे श्री. शिंदे (मंडळ कृषि अधिकारी) आणि श्री. सूरज पाटील (आत्मा) यांचीही उपस्थिती होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेतीच्या फायदेशीर तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादन टिकाऊ करता येईल. विशेषतः जैविक खते, गांडूळ खत आणि हरित खतांचा प्रभावी वापर यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाचा *प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा आणि जैविक शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. #ViksitKrishiAbhiyan #ViksitKrishi #ICAR #agriculture #ViksitKrishiAbhiyan #viksitkrishiabhiyan #viksitkrishiabhiyan2025 #viksit_krishi_abhiyan #kvksagroli #KrishiVigyanKendra #agriculture #farmer #farming Shivraj Singh Chouhan @officialicarindia @narendramodi_pmoindia #ataripune

Post a Comment

0 Comments