प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित – कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे थेट प्रक्षेपण

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित – कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे थेट प्रक्षेपण व तांत्रिक प्रशिक्षणाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह


बिलोली, २ ऑगस्ट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता वाराणसी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹२०,५०० कोटींचा निधी जमा करण्यात आला.

सागरोळीत थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन
या ऐतिहासिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना यावेळी केंद्र शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचे समाधान व्यक्त झाले.
फळपिकांवरील विशेष तांत्रिक प्रशिक्षण
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबा आणि लिंबवर्गीय फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. यात आधुनिक लागवड प्रणाली, उत्पादन वाढीचे उपाय, सेंद्रिय शेती पद्धती आणि विपणन साखळी यावर भर देण्यात आला. डॉ संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले.
उद्घाटन व उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी श्री. विवेक गुडुप यांच्या हस्ते झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन कृषी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मंचावर डॉ माधुरी रेवणवार, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, डॉ कपिल इंगळे, श्री वेंकट शिंदे, नांदेड प्रगतीचे श्री शिवशेटे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणातून लाभ मिळाल्याचे सांगत आपले अनुभवही शेअर केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ज्ञानवृद्धीची संधी मिळाली. PM-KISAN योजनेच्या लाभांबरोबरच आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा ठरला. #PMKisan #PMKisanSammanNidhi #agriculture #farmer



20th Installment of PM-KISAN Distributed – Live Telecast and Technical Training at Krishi Vigyan Kendra, Sagroli Spark Enthusiasm Among Farmers Biloli, August 2 – Prime Minister Narendra Modi distributed the 20th installment of the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme at a grand event held in Varanasi. Under this initiative, approximately ₹20,500 crore was directly transferred to the bank accounts of around 9.7 crore eligible farmers across the country.

Live Telecast and Guidance at Sagroli
The historic event was live-streamed at the SSM's Krishi Vigyan Kendra (KVK) in Sagroli, Biloli Taluka. Hundreds of farmers from the surrounding areas attended the program with great enthusiasm. They received valuable information about various central government agricultural schemes and expressed their satisfaction.

Specialized Technical Training on Fruit Crops
In the second session of the program, special training was conducted on cultivation techniques for mango and citrus fruits. The session focused on modern planting systems, productivity enhancement strategies, organic farming methods, and marketing chains. Dr. Santosh Chavan, a horticulture expert, provided highly useful insights and guidance.

Inauguration and Dignitaries Present
The program was inaugurated by Taluka Agriculture Officer Mr. Vivek Gudup, who interacted with farmers and emphasized the importance of new agricultural policies. Other dignitaries present on the dais included Dr. Madhuri Revanwar, Head of KVK Sagroli, Dr. Kapil Ingle, Mr. Venkat Shinde, and Mr. Shivshete from Nanded Pragati. Participating farmers shared their experiences and expressed the benefits they gained from the training. The successful organization of the event was made possible by the dedicated efforts of the KVK staff.

This initiative provided farmers not only with financial support but also an opportunity to enhance their knowledge. Alongside the benefits of the PM-KISAN scheme, farmers felt inspired to adopt modern agricultural practices. Overall, the program proved to be doubly beneficial for the farming community.

Post a Comment

0 Comments