राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादन वाढ आणि मूल्य साखळी

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादन वाढ आणि मूल्य साखळी



राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादन वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन देगलूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री. विठ्ठल गीते यांनी केले. उद्यमिता लर्निंग सेंटर, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन पिकातील विविध प्रात्यक्षिकांसाठी निवडलेल्या २०० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. या प्रशिक्षणाचा उद्देश सोयाबीन उत्पादन वाढवून खाद्यतेलासाठी भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.

या अभियानांतर्गत, सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्रात ८ तालुक्यातील ७५ गटांमधील ३००० शेतकऱ्यांना सोयाबीनच्या सुधारित बियाण्यांचा वापर, आधुनिक शेतीतज्ज्ञांच्या मदतीने शेतीचे तंत्रज्ञान, थेट विपणन व्यवस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागाबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमात नांदेड येथील प्रगती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, कुंडलवाडी मूल्य साखळी भागीदार म्हणून सहभागी झाली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी थेट जोडणी साधून अधिक नफा मिळवण्यास मदत होईल. #राष्ट्रीयखाद्यतेलअभियान #सोयाबीनउत्पादन #शेतकरीउत्पादककंपनी #कृषीविकास #आत्मनिर्भरभारत #सगरोळी #देगलूर #शेतीतंत्रज्ञान #शेतकरी #प्रशिक्षण #FoodForAll


Sub-Divisional Agriculture Officer Shri. Vitthal Gite of Deglur emphasized the crucial role of Farmer Producer Companies (FPCs) in boosting soybean production and developing the value chain under the National Edible Oil Mission. His comments were made during the inauguration of a training program for 200 farmers at the Entrepreneurship Learning Centre, Krishi Vigyan Kendra (KVK) in Sagroli.

The training program is a key part of the National Edible Oil Mission, with a primary goal of increasing soybean production to reduce India's dependence on edible oil imports. The initiative also aims to increase farmers' income and make them self-reliant.

Under this mission, the KVK Sagroli is providing guidance to 3,000 farmers from 75 groups across eight districts. The focus is on using improved soybean varieties, modern farming techniques with the help of agricultural experts, and establishing direct marketing systems. The involvement of FPCs is a core component of this strategy.

Pragati Agro Producer Company from Nanded is participating as a value chain partner in this program. This collaboration will help farmers adopt modern technology and connect directly to markets, ultimately leading to higher profits.

#NationalEdibleOilMission #SoybeanProduction  #FarmerProducerCompany #AgriculturalDevelopment  #SelfReliantIndia #Sagroli #Deglur #FarmingTechnology #Farmers #Training #FoodForAll

Post a Comment

0 Comments