तळणी येथे २० वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

तळणी येथे २० वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी तर्फे तळणी येथे २० वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम पार पडला. रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकविण्याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रीय निविष्ठांचा वापर व त्यांची निर्मिती जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी कशी उपयुक्त ठरते, यावर भर देण्यात आला. तसेच माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून माती परीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले. येणाऱ्या काळात अल निनोच्या प्रभाव कमी करण्यासाठी बीबीएफ पेरणी तंत्राचा अवलंब व कमी कालावधीचे वाण निवडण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन करण्यात आले. कार्यक्रमानंतर बिलोली येथील शेतकऱ्यांच्या आंबा व पेरू बागांना भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र सागरोळीचे डॉ. प्रवीण चव्हाण व डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. #agriculture #farming #ClimateSmartAgriculture


20th Farmer–Scientist Interaction Program Held at Talni

Ahead of the upcoming Kharif season, the Krishi Vigyan Kendra, Sagroli organized the 20th Farmer–Scientist Interaction Program at Talni with great enthusiasm. The primary focus was to guide farmers on the balanced use of chemical fertilizers to maintain soil fertility and health. Experts emphasized the importance of incorporating organic inputs and their production methods to improve soil quality. They also highlighted the necessity of soil testing, urging all farmers to undertake it regularly.  Guidance was provided on adopting Broad Bed Furrow (BBF) sowing techniques and selecting short-duration crop varieties to mitigate the impact of El Niño in the coming season. The program was conducted in an interactive manner, with farmers’ queries addressed directly. Following the session, technical guidance was extended during visits to mango and guava orchards of farmers in Biloli. Dr. Pravin Chavhan and Dr. Santosh Chavhan from Krishi Vigyan Kendra, Sagroli, resolved farmers’ doubts and provided practical solutions.


Post a Comment

0 Comments