कर्तव्याचा गौरव! डॉ. निहाल मुल्ला यांना "गुणवंत पशुवैद्यक" पुरस्काराने सन्मानित!

कर्तव्याचा गौरव! डॉ. निहाल मुल्ला यांना "गुणवंत पशुवैद्यक" पुरस्काराने सन्मानित!



🎉
पशुसंवर्धन विभाग, नांदेड व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पशुसंवर्धन दिन' सोहळ्यात डॉ. निहाल मुल्ला यांना "गुणवंत पशुवैद्यक" म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. हा गौरव म्हणजे कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि धर्मा डाँकी सॅंक्च्युरी (DDS) च्या माध्यमातून चारा नियोजनाविषयी पशुपालकांमध्ये केलेली जनजागृती, विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन आणि पशू आरोग्य शिबिरांद्वारे घेतलेले अथक परिश्रम यांची मिळालेली पोचपावती आहे.
🌾🐂
उल्लेखनीय कार्या: - माळेगाव यात्रेदरम्यान आणि "ग्लॅंडर्स" सारख्या घातक रोगाच्या प्रादुर्भावावेळी त्यांनी केलेली जनजागृती अत्यंत मोलाची ठरली. किनवट येथे प्राणी कल्याण आणि संरक्षणासाठी राबवलेली 'इयर टॅग' मोहीम पशुसंवर्धनात महत्त्वाची ठरली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत मा. जिल्हाधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), नांदेड यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले आहे. #agriculture #animals #kvksagroli #पशुसंवर्धनविभाग #नांदेड #गुणवंतपशुवैद्यक #डॉनिहालमुल्ला #पशुवैद्यकसंघटना #पशुपालकजनजागृती #गौरवसोहळा #अभिमान #AnimalHusbandry #VeterinaryAward #ProudMoment

Post a Comment

0 Comments