केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती योजना) अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
कापूस पिकातील उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती) अंतर्गत पंचायत समिती नायगाव आणि अर्जापूर ता. बिलोली येथे कृषी विभागामार्फत प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन करताना डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड, अतिसघन कापूस लागवड (HDPS) आणि कापूस एकात्मिक पिक व्यवस्थापन या तीन पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी वरील तिन्ही पद्धतीमधील लागवडीचे अंतर, बियाण्याची निवड, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर, तण व्यवस्थापन, वाढरोधकांचा योग्य वापर, पावसाच्या खंड पडल्यास पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. देवरे तालुका कृषी अधिकारी नायगाव, श्री. बच्चेवार, आत्माचे श्री. अरुण पवार व श्री. सतीश कांबळे उपस्थित होते. #agriculture #farming #cotton #CropManagement #SmartFarming #केंद्रशासन #कापूसउत्पादकताअभियान #कपासकांती #कापूसलागवड #कृषीविभाग #नायगाव #बिलोली #नांदेडकृषी #अतिसघनकापूसलागवड #HDPS #शेतकरीप्रशिक्षण #आधुनिकशेती #कृषीविज्ञानकेंद्र #शेतकरी #कापूसव्यवस्थापन #CottonProductivity


0 Comments