पेनूर, येथे शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व खेत बचाओ’ अभियान कार्यक्रम

पेनूर, येथे शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व खेत बचाओ’ अभियान कार्यक्रम


कार्यक्रमात खतांचा संतुलित वापर, एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन व माती परीक्षणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अनियमित पावसासाठी आकस्मिक पीक नियोजन व दुष्काळ सहनशील वाणांच्या वापरावर भर देण्यात आला. प्रात्यक्षिकांद्वारे खत मात्रा, जैविक कीड नियंत्रण व ओलावा संवर्धन तंत्रे समजावून सांगण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण व डॉ. प्रवीण चव्हाण यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभाग, लोहा चे मंडळ कृषी अधिकारी श्री. शिंदे, बीटीएम सुरज पाटील व कृषी सहाय्यक देखील उपस्थित होते. पेनूर व परिसरातील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला.
#शेतकरीशास्त्रज्ञपरिसंवाद #खेतबचाओअभियान #पेनूर #लोहाकृषीविभाग #खरीपहंगाम२०२६ #मातीपरीक्षण #हवामानअंदाज #एलनिनो #जैविकशेती #कृषीमार्गदर्शन #बळीराजा #ModernFarming #FarmersOfMaharashtra #ICAR Icaratari Pune Indian Council of Agricultural Research PMO India



Post a Comment

0 Comments