राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत श्री. शंकर पटने, मु. बावलगाव, ता. बिलोली, जि. नांदेड यांच्या शेतावर नैसर्गिक शेतीच्या प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी (डेमो युनिट) अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता यावीत व त्यांचा प्रभावी अवलंब करता यावा, या उद्देशाने त्यांच्या प्रक्षेत्रावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील डॉ. कृष्णा अंभुरे, शास्त्रज्ञ–पीक संरक्षण, यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तिची आवश्यकता तसेच शाश्वत शेतीसाठी असलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ–कृषी विस्तार, यांनी रासायनिक शेतीमुळे पर्यावरण, मातीचे आरोग्य, जैवविविधता तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यानंतर कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनचे मास्टर ट्रेनर श्री. विश्वनाथ होळगे यांनी विविध नैसर्गिक निविष्ठांची निर्मिती, त्यांचा योग्य वापर, फायदे आणि व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध नैसर्गिक निविष्ठांची निर्मिती करून दाखविण्यात आली, त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची तंत्रे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास उप कृषी अधिकारी श्री. टेंभुर्णीकर तसेच आत्माचे श्री. सतीश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. #agricultura #farming #organic #kvksagroli #राष्ट्रीय_नैसर्गिक_शेती_मिशन #प्रात्यक्षिक #नैसर्गिक

Post a Comment

0 Comments