बिलोली येथील महिला मेळाव्यात कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मार्गदर्शन

बिलोली येथील महिला मेळाव्यात कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मार्गदर्शन 



🌾
बिलोली येथील महिला मेळाव्यात कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मार्गदर्शन 🌾
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथे महिला आघाडीतर्फे शेतकरी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी “महिलांचे शेतीमधील योगदान – काळाची गरज” या महत्त्वपूर्ण विषयावर शेतकरी महिलांना सविस्तर व मार्गदर्शनपर मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकरी महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशवीमध्ये बियाणे, गांडूळखत, विळा, रोपे व टॉर्च यांचा समावेश असलेले कृषी साहित्य किट वितरित करण्यात आले. या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई चोंडीकर-गोपछडे, अटल फाउंडेशनच्या युवा प्रदेशाध्यक्ष डॉ. श्रुती तुडमे तसेच महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. #agriculture #farming #farmerwomen #WomenInAgriculture #AgriNews #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #नांदेड #शेतकरीमहिला #देवेंद्र_फडणवीस #DevendraFadnavis #Biloli #kvksagroli



Post a Comment

0 Comments