धानज (ता. लोहा) येथे 'खेत बचाव अभियान' व 'अल निनो' जनजागृती कार्यक्रम

धानज (ता. लोहा) येथे 'खेत बचाव अभियान' व 'अल निनो' जनजागृती कार्यक्रम


🌾 धानज (ता. लोहा) येथे 'खेत बचाव अभियान' व 'अल निनो' जनजागृती कार्यक्रम
या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सद्यस्थितीतील शेती समोरील आव्हाने आणि त्यावरील उपायांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनानंतर लगेचच प्रश्न-उत्तर सत्र घेऊन शेतकऱ्यांच्या मनातील विविध शंका व प्रश्नांचे जागेवरच निरसन करण्यात आले.
या मध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा याच्या उपाययोजना, माती परीक्षण आधारित संतुलित खत व्यवस्थापन आणि रासायनिक खतांना पर्यायी व्यवस्थापन, बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी योग्य वाणांची (बियाणे) निवड आणि 'बीबीएफ' (BBF) पेरणी पद्धतीचे महत्त्व, बदलत्या वातावरणाचा पशुधनावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर सखोल मार्गदर्शन. #खेतबचावअभियान #अलनिनो #धानज #लोहा #शेतकरीजागृती #हवामानअनुकूलशेती #मातीपरीक्षण #बीबीएफपेरणी #पशुधनसंगोपन #सेंद्रियकर्ब #कृषीमार्गदर्शन #शेतीविश्व #FarmersOfIndia #ICAR #kvksagroli Icaratari Pune Indian Council of Agricultural Research

Post a Comment

0 Comments