पशुसंवर्धनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: प्रगत आणि स्मार्ट शेतीकडे वाटचाल!

पशुसंवर्धनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: प्रगत आणि स्मार्ट शेतीकडे वाटचाल!



पशुसंवर्धनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: प्रगत आणि स्मार्ट शेतीकडे वाटचाल!

🐄📱

पशुपालन क्षेत्र आता केवळ पारंपरिक राहिले नसून त्यात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. 'Advances in Animal Husbandry, Veterinary and Aquatic Sciences' या पुस्तकात डॉ. निहाल मुल्ला (विषय तज्ज्ञ, पशुसंवर्धन विभाग, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ) यांनी या विषयावर मत व्यक्त केले.
या लेखातील प्रमुख वैशिष्ट्ये: - प्रिसिजन लाइव्हस्टॉक फार्मिंग (PLF): डेटा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणे, ज्यामुळे उत्पादकता वाढते आणि पर्यावरणावरील परिणाम कमी होतो.
- स्मार्ट ॲनिमल मॉनिटरिंग (SAM): जनावरांचे वर्तन, शारीरिक हालचाली आणि आरोग्यविषयक घटकांचे सेन्सर्सद्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंग करणे.
- AI आणि IoT ची जोड: जनावरांच्या आरोग्याबद्दल अचूक माहिती मिळवून तातडीने निर्णय घेणे, ज्यामुळे आजारांचे वेळीच निदान होते आणि औषधांचा खर्च कमी होतो.
- सक्षम व्यवस्थापन: तंत्रज्ञानामुळे संसाधनांचा कमी वापर करून अधिक दर्जेदार पशुजन्य उत्पादने (दूध, मांस इ.) मिळवणे आता शक्य झाले आहे.
या तंत्रज्ञानावर आधारीत शेळीपालनाचा प्रायोगिक तत्ववार वापर कृषि विज्ञान केंद्र,सगरोळी येथे करण्यात येत आहे.





Post a Comment

0 Comments