खेत बचाओ अभियान: सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात 'खरीप पीक लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण!

खेत बचाओ अभियान: सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात 'खरीप पीक लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण!



🌾
खेत बचाओ अभियान: सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात 'खरीप पीक लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण! 🌾
संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे BCRC प्रकल्पांतर्गत 'खेत बचाओ अभियान' अंतर्गत एक दिवसीय "खरीप पीक लागवड तंत्रज्ञान" प्रशिक्षण कार्यक्रम. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
मार्गदर्शन: डॉ. कृष्णा अंभुरे यांनी बदलत्या हवामानाचे नियोजन : 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर पावसाचा खंड पडल्यास काय उपाययोजना कराव्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड कशी करावी, याबद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा संतुलित वापर, पर्यायी उपलब्ध खते, जैविक खते आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. तसेच सोयाबीन, कापूस व हळद या खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती दिली.
डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात फळबाग आणि भाजीपाला लागवडीचे नियोजन कसे करावे, याचे उत्तम व्यवस्थापन तंत्र मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी BCRC प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. संतोष तेलंगे व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणाचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. #खेतबचाओअभियान #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #नांदेड #खरीपहंगाम #पीकलागवड #सोयाबीन #कापूस #हळद #फळबागलागवड #सेंद्रियशेती #जैविकखते #कृषीमार्गदर्शन #हवामानबदल #BCRCप्रकल्प #बळीराजा #शेतीतंत्रज्ञान #ICAR Icaratari Pune

Post a Comment

0 Comments