खेत बचाओ अभियान: पाटोदा बु. येथे शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद संपन्न!
पाटोदा बु. (ता. धर्माबाद) येथे कृषी विभाग, आत्मा आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने 'खेत बचाओ' अभियानांतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण व मृदा आरोग्य पत्रिकेनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉ. संतोष चव्हाण यांनी केले. एल निनो व खरीप नियोजन: पावसाच्या अनियमितेवर मात करण्यासाठी कमी कालावधीच्या वाणांची निवड, पीक वैविध्य आणि BBF पद्धत व आच्छादन यांसारख्या ओलावा संवर्धन तंत्रांवर भर देण्यात आला. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. या प्रसंगी धर्माबादचे तालुका कृषी अधिकारी विवेक गुडूप, मंडळ कृषी अधिकारी वाघमारे, बीटीएम श्रीकांत गुंडावार, सहायक कृषी अधिकारी वानखेडे यांच्यासह गावचे सरपंच व पोलीस पाटील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #खेतबचाओअभियान #खरीपनियोजन #मातीपरीक्षण #BalancedFertilization #KBA #SustainableAgriculture #KhetBachaoAbhiyaan #BBFतंत्रज्ञान #शेतकरीसंवाद #हवामानअनुकूलशेती #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #धर्माबाद #पाटोदा #एलनिनो #ICAR @Icaratari Pune


0 Comments