हळद पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व: लालवंडी (ता. नायगाव) येथे यशस्वी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

हळद पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व: लालवंडी (ता. नायगाव) येथे यशस्वी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक


या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हळद पिकाचे उत्पादन वाढविणे तसेच कंदांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगणे हा होता. डॉ. संतोष चव्हाण, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM), तसेच निविष्ठांवरील खर्च कमी करण्यासाठी जैवखते व जैविक कीडनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. यामुळे हळद पिकामध्ये शाश्वत व किफायतशीर उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होते. या कार्यक्रमामध्ये गावातील एकूण १९ हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी १३ शेतकऱ्यांची प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली. निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर प्रायोगिक वापरासाठी हळद बूस्टर उपलब्ध करून देण्यात आले. या उत्पादनाच्या वापरामुळे हळदीच्या उत्पादनात १५–२५% वाढ होण्यास तसेच कंदांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. शेतकऱ्यांना हळद बूस्टरच्या वापराचे शिफारस केलेले वेळापत्रकही समजावून सांगण्यात आले. या पद्धतीने योग्य वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास पिकाची वाढ व विकास चांगला होऊन उत्पादनक्षमता वाढविण्यास आणि उच्च प्रतीची हळद मिळविण्यास मदत होते.


Training and Frontline Demonstration on Turmeric Special Micronutrient

A training programme and frontline demonstration on the use of Turmeric Special Micronutrient in turmeric was organized at Lalwandi, Tq. Naigaon, on 14 August 2026. The programme focused on the importance of micronutrients in promoting healthy crop growth, enhancing yield, and improving
rhizome quality.

Dr. Santosh Chavan, Subject Matter Specialist (Horticulture), guided the farmers on Integrated Nutrient Management (INM) practices, along with the use of bio fertilizers and bio pesticides to reduce input costs and promote sustainable turmeric production.

A total of 19 turmeric growers participated in the programme, of whom 13 farmers were selected for the frontline demonstration. Selected farmers were provided with Turmeric Booster for field-level
evaluation. The product has the potential to improve turmeric yield by 15–25% and enhance rhizome quality.

The recommended application schedule was also explained to the farmers. The first spray is advised 60 days after planting, followed by subsequent sprays at 90 and 120 days after planting. Timely and systematic application of the micronutrient helps maintain optimum crop growth, improve productivity, and achieve better-quality turmeric rhizomes.

Post a Comment

0 Comments